सातारा : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी पतीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नी घटस्फोट देणार आहे, असे म्हटल्याने राग येवून पतीनेच पत्नीचे एकांतवासातील आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर पोस्ट केला. ही घटना दि. 14 जून रोजी घडली आहे. पत्नीला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.