सातारा : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (दुसरं पर्व) शुभारंभ व जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन वाई येथील न.पा.शाळा क्र.१ येथे उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमाचे फित कापुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सागर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी साईनाथ वाळेकर व लोकप्रतिनिधी तेजस जमदाडे यांच्या मार्फत उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व भगवान धन्वंतरी पुजनाने करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल पवार यांनी प्रास्ताविकपर अभियानाची माहिती व देण्यात येणाऱ्या उपचार, संदर्भ सेवा व मोफत शस्त्रक्रियासंबंधी माहिती दिली. याशिवाय,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तालुका वाई अंतर्गत कामकाजाची आढावा घेऊन माहिती देण्यात आली.
यावेळी डॉ.तेजश्री कांबळे व डॉ. सुषमा कांबळे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत देण्यात येणाऱ्या संदर्भ सेवाची सविस्तर माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात तालुका आरोग्यअधिकारी. डाॅ. गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची गरज व पालकांमध्ये जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी वाळेकर यांनी शिक्षण विभागाच्या सहभाग व सहकार्य याबद्दल आश्वस्त केले. लोकप्रतिनिधी तेजस जमदाडे यांनी मनोगत व्यक्त करुन समाजसेवा, प्रशासनाचा सहभाग व सहकार्यासाठी आश्वस्त केले.
सदर कार्यक्रमासाठी हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया झालेल्या पालकांची उपस्थिती होती.त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करुन राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी यांचे आभार मानुन कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी डॉ. सुनिल चंदनकार (वैद्यकीय अधिकारी) यांनी दुसरं पर्व शुभारंभ व अभियानाचा मुळं उद्देश पालक सहभाग व जनजागृती बद्दल मार्गदर्शन करून आभार मानले. सदर कार्यक्रमानंतर शालेय आरोग्य तपासणी करुन उपस्थित विद्यार्थ्यांना उपचार व संदर्भ सेवा देण्यात आली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना तेजस जमदाडे व शसागर जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. सुत्रसंचलन औषध निर्माण अधिकारी धनश्री गाढवे व मनिषा राऊत यांनी केले.याकामी, अधिकारी व कर्मचारी यांनी अथक असे परिश्रम घेतले.
यावेळी मुख्याध्यापक दळवी, जयश्री जमदाडे (अंगणवाडी सेविका) व नरेंद्र सनस (आरोग्य सहाय्यक) उपस्थित होते. वैदकिय अधीक्षक डॉ.सचिन वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली नीटनेटका कार्यक्रम पार पडला.