ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे वेणेखोल प्रकल्पग्रस्तांना १९.५२ कोटींचे पॅकेज

by Team Satara Today | published on : 27 October 2026


सातारा : उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल (ता. सातारा) या पुनर्वसित गावठाणातील ८० खातेदारांना म्हसवड (ता. माण) येथे पर्यायी जमिनी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र या खातेदारांनी जमिनीऐवजी रेडीरेकनर दराच्या तीनपट दर स्विकारण्यास सहमती दिली होती. तशी मागणी या सर्वांनी ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली होती. शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा विभागाने या खातेदारांच्या पुनर्वसनासाठी संपादित करावयाच्या क्षेत्राच्या २०२५-२६च्या रेडीरेकनर दराच्या तीनपट १९ कोटी ५२ लाख ०३ हजार ६८ रूपयांचे पुनर्वसन अनुदानास मंजूरी दिली.
वेणेखोल येथील ८० खातेदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात खातेदारांनी शिवेंद्रराजे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. तसेच म्हसवड येथे पर्यायी जमिनी ऐवजी रेडीरेकनर दराच्या तीनपट दर स्विकारण्यास त्यांनी सहमती दिली होती. यासंदर्भात शिवेंद्रराजे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनात बैठक बोलावून प्रशासन व खातेदार यांची चर्चा घडवून आणली. चर्चेअंती म्हसवड येथे रेडीरेकनर दराच्या तीनपट एकरक्कमी रोख अनुदान मिळवून देण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याच्या सूचना शिवेंद्रराजे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. हा प्रस्ताव जलसंपदाकडे गेल्यानंतर त्यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महात्मा जोतीराव फुलेंच्या क्रांतिकारक विचारावर साताऱ्यात २८ नोव्हेंबरपासून संबोधी व्याख्यानमाला; महाराष्ट्रातील मान्यवर विचारवंत, साहित्यिकांची भाषणे होणार
पुढील बातमी
निंभोरे गावच्या हद्दीत ऊस ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात युवक ठार; अडीच महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

संबंधित बातम्या