गुजरात : पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुसळधार पाऊस आणि पुराच्या उद्रेकानंतर आता पसरलेल्या गूढ तापामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या तापावर डॉक्टर उपचार करू शकत नसल्याचे स्थानिक जिल्हा पंचायत सदस्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, मृत्यूचे कारण निमोनाइटिस असल्याचे दिसून आले, जरी याची पुष्टी झालेली नाही. कच्छचे जिल्हाधिकारी अमित अरोरा म्हणाले, तालुक्यात वैद्यकीय सेवेत वाढ झाली आहे. H1N1, स्वाइन फ्लू, क्रिमियन-काँगो ताप, मलेरिया, डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन नमुने गोळा केले जात आहेत.
न्यूमोनायटिस हा मृत्यूला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याचे दिसून येत नाही. या मृत्यूचे मुख्य कारण न्यूमोनाइटिस असल्याचे मानले जात आहे. तापामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. कच्छ जिल्हा पंचायत सदस्य मीनाबा जडेजा यांनी गुजरात काँग्रेसचे प्रमुख शक्ती सिंह गोहिल यांना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की 3 सप्टेंबरपासून बेखडा, सानंद्रो, मोरगर आणि भारवंध गावात तापामुळे 12 लोकांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकारी अमित अरोरा म्हणाले की, आजूबाजूच्या गावांमध्ये वैद्यकीय सेवा वाढवण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे. 22 पथके आणि डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी सर्व लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांच्या तब्येतीत कोणतीही गडबड जाणवताच तज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्यावा.
एका रुग्णाला अहमदाबादला पाठवण्यात आले. परंतु, रुग्ण तापातून बरा होऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, न्यूमोनिया झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता, तर दुसरे जिल्हा पंचायत सदस्य मामद जंग जाट म्हणाले की, डॉक्टर या आजारावर योग्य उपचार करू शकले नाहीत, ज्यामुळे मृत्यू झाला.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |