फलटण : फलटण नगर परिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापतींची निवडी बिनविरोध झाल्या असून बांधकाम समितीच्या सभापती पदी सोमाशेठ जाधव तर नियोजन व विकास समिती च्या सभापती संदिप चोरमले यांची निवड करण्यात आली आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव अध्यक्षतेखाली तर नगराध्यक्ष समशेसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही विशेष सभा संपन्न झाली. यामध्ये या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदी उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले (पदसिद्ध सभापती). स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी सचिन अहिवळे. पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती पदी राहुल निंबाळकर. नियोजन व विकास समिती सभापती पदी संदिप चोरमले.महिला व बालकल्याण समिती : सभापती पदी सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे, तर उपसभापती पदी सौ. कांचन दत्तराज व्हटकर. मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती सभापतीपदी सौ. सुपर्णा सनी अहिवळे.
नगरपालिकेची सर्वाधिकार संपन्न 'स्थायी समिती' अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर कामकाज पाहणार आहेत, तर सर्व विषय समित्यांचे नवनिर्वाचित सभापती हे या समितीचे पदसिद्ध 'सदस्य' असणार आहेत.याशिवाय, सभागृहातून भाजपचे गटनेते रोहित नागटिळे, नगरसेवक अशोकराव जाधव आणि शिवसेना राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे (आबा) यांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.