सातारा : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मनोज अमृतराव देशमुख यांची निवड झाली.
ही निवड प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नियुक्तीपत्राद्वारे केली.
मनोज देशमुख हे शिक्षणाने प्रोडक्शन इंजिनियर असून पुणे येथे त्यांनी एमबीए केले आहे.मनोज देशमुख हे गेली दोन दशके सातारच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मनोज देशमुख यांचे मूळ गाव सिद्धेश्वर कुरोली असून सामाजिक चळवळीत त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी सोपानराव बंडोबा देशमुख यांचे ते नातू तसेच मनोजचे वडील अमृतराव उर्फ बाळासाहेब देशमुख हे महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक व वडूज खरेदी विक्री संघ यांचे विद्यमान संचालक आहेत.
जायंट्स ग्रुप सातारा च्या माध्यमातून मनोज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्वात पहिली निर्भया पोलीस चौकी यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या परिसरात उभी केली गेली व त्या पोलीस चौकीमुळे दरवर्षी जवळजवळ रयत शिक्षण संस्थेच्या चाळीस हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. याचबरोबर मनोज देशमुख यांच्या पुढाकाराने अजंठा चौक व वाडे फाटा या ठिकाणी जनसहभागातून पोलीस चौक्या उभ्या करण्यात आल्या आहेत.
सध्या ते मराठा बिझनेसमेन फोरमचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची व धडाडीची दखल घेऊन राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील यांनी मनोज देशमुख यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी निवड केली.
देशमुख यांच्या निवडीने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नेतृत्वाला योग्य न्याय मिळाला असल्याचा आनंद सगळीकडे व्यक्त केला जातोय. या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मा.ना.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरज चव्हाण, राज्यसभा खासदार सौ. सुनेत्राताई पवार, आमदार मकरंद आबा पाटील, विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा मराठा बिझनेसमेन फोरमचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, सचिव जगदीश शिर्के, राहुल यादव, अंकित जगताप यांनी मनोज देशमुख यांचे अभिनंदन केले.