महाबळेश्वर तहसील कार्यालयात महिला दिनानिमित्त शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात

by Team Satara Today | published on : 09 March 2025


सातारा : महाबळेश्वर तालुक्यामध्ये शनिवार दि.८ मार्च रोजी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन तहसिल कार्यालय महाबळेश्वर येथे साजरा करणेत आला.

यावेळी कार्यक्रमासाठी शेतकरी महिला व स्थानिक निवासी महिला यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यामध्ये उपस्थित महिलांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करणेत आला.

महिला दिनाचे औचित्य साधून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करून महाबळेश्वर तालुक्यातील काही नागरीक / शेतकरी हे मुंबई व परगावी कामानिमित्त रहात असलेल्या तसेच स्थानिक निवासी शेतकरी व नागरिक यांना महसूल खात्याअंतर्गत सुविधा देण्यात आल्या. तसेच याबाबत कार्यालयीन महसूली कामकाज दिवसभर चालू ठेवण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये रहिवाशी दाखले, जातीचे दाखले इत्यादी ३१ दाखले वाटप करणेत आले. उपस्थित सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचेकडून ८अ, ७/१२ व फेरफार नक्कल एकूण २९१ वाटप करणेत आले, रेशनकार्ड-१११ वाटप करणेत आल्या, लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत एकूण २६ अर्ज मालकी हक्काची नोंद सहहिस्सेदार म्हणून घेणेकामी पती व पत्नी अर्जदार यांचेकडून प्राप्त झाले. सदर कार्यक्रमामध्ये तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी लक्ष्मी मुक्ती योजने बाबत मार्गदर्शन केले. तसेच अॅग्री स्टॅक बाबत ७/१२ सदरी महिलांची नोंद झाल्यानंतर तात्काळ शेतकरी नोंदणी करण्याबाबत आवाहन केले.

सदर कार्यक्रमासाठी नायब तहसिलदार, सहायक महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक, पोलिस पाटील व नागरीक, शेतकरी उपस्थित होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली खा. उदयनराजे यांची सदिच्छा भेट
पुढील बातमी
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

संबंधित बातम्या