आदेशाचे उल्लंघन; एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 August 2025


सातारा : संगम माहुली, ता. सातारा येथील मिळकत क्र. 195 ही न्यायालयाच्या आदेशानुसार सील केली असतानाही एकाने न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघन करत सील तोडले. दि. 2 रोजी हा प्रकार घडला. याबाबत युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर अनुज अशोक कपूर (वय 37) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अतुल आनंदराव साबळे (रा. संगम माहुली, पो. क्षेत्र माहुली, ता. सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली मोहोळकर यांची पदोन्नतीने बदली
पुढील बातमी
शाहूनगरातून सायकलची चोरी

संबंधित बातम्या