सातारा : अज्ञात चोरट्याने अंगापूर वंदन येथून दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंगापूर वंदन ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीएम 2194 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 12 नोव्हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सुर्यकांत जगन्नाथ कणसे (वय 64, रा. अंगापूर वंदन) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.