सातारा : सातारा शहर सह तालुक्यात घडलेल्या दोन चैन स्नॅचिंग प्रकरणी चार अज्ञातांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दौलत नगर येथील एक महिला त्यांच्या दोन मैत्रिणींसोबत जुना आरटीओ चौकातून जात असताना पाठीमागून एका मोटरसायकल वरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन जणांनी संबंधित महिलेच्या गळ्यातील सुमारे 12 हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र ओढून घेऊन ते गाडीवरून पळून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 6 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील म्हसवे गावच्या हद्दीत कृष्णा भीमराव शिंदे रा. कारंडवाडी, ता. सातारा यांची चाळीस हजार रुपये किंमतीची एक तोळा वजनाची सोन्याची चैन दुचाकी वरील अज्ञात चोरट्याने हिसकावून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ढाणे करीत आहेत.