सातारा पालिका सभागृहात लागले प्रभागनिहाय रचनेचे नकाशे

by Team Satara Today | published on : 18 August 2025


सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक विभागाने प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी नगरपालिका  सभागृह येथे लावण्यात आले आहेत. याबाबत सातारकरांच्या हरकती स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. त्या हरकती ३१ ऑगस्टपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया ३0 सप्टेंबरपर्यंत चालणार असून त्यानंतर कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असणार, हे निश्चित होणार आहे.

पालिकेच्या निवडणूकीकरता प्रभाग हे दोन सदस्यांचे असणार आहेत. त्या प्रभागात कोणते आरक्षण असेल, कसा प्रभाग असेल याबाबत हरकती व प्रभाग रचना निश्चिती करण्यासाठी सातारा नगरपालिकेने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार छ. शिवाजी महाराज सभागृहात प्रत्येक प्रभागाचे नकाशे चिटकवण्यात आले आहेत. त्या प्रभागाची चतु:सिमा, प्रभागातील लोकसंख्या, प्रभागाची माहिती दिली गेली आहे. सातारकरांना २५ प्रभागातील काही आक्षेप, हरकती असतील त्या मांडण्याकरता दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सातारकरांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी एकही हरकत आलेली नव्हती. दरम्यान, सातारा हरकती आल्यानंतर त्या हरकतीवर सक्षम प्राधिकृत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होवून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर अतिंम प्रभाग रचना जाहीर करुन आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यास ३0 सप्टेंबर उजाडेल असे सांगण्यात आले. दरम्यान, प्रभागाच्या रचनेमध्ये ६ एससी त्यात तीन महिला, १ एसटी, १४ ओबीसी त्यात सात महिला, असे आरक्षण पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्मरणिका संपादन समिती गठीत
पुढील बातमी
...अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल

संबंधित बातम्या