04:37pm | Aug 30, 2024 |
पालघर : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळ्याप्रकरणी शिवरायांची जाहीर माफी मागितली. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही काळापासून या भूमीचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान केला जातो. मात्र, त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात जातात, पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. माझ्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा महाराजा महापुरुष नाही आहेत. तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. म्हणून मी आज माझे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर मस्तक झुकवून माफी मागतो.
याचबरोबर, आमच्यावर वेगळे संस्कार आहेत. आम्ही ते लोक नाही आहोत, जे या भारतमातेचे या भूमीवरील वीर सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलत असतात. त्यांचा अपमान करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपशब्द उच्चारूनही जे माफी मागायला तयार होत नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुराडा करत आहेत. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत. उलट न्यायालयात जातात, पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही. महाराष्ट्राची जनता आता त्यांच्या संस्कारांना ओळखत आहेत, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पासाठी तब्बल ७६००० कोटी खर्च करण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
देशातील सर्वात मोठे पोर्ट होणार
या बंदरासाठी ७६ हजार कोटींहून अधिक जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असणार आहे. देशच नाही तर जगातील सर्वात मोठे पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचे किती मोठे केंद्र होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |