08:52pm | Nov 26, 2024 |
सातारा : फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे निष्णाई देवी ग्राहक सहकारी संस्थेच्या असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानमधून २0१0 पासून मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. दरम्यान, चुकीच्या व्यवस्थेमुळे गांवातील मारुती सुळ यांना कित्येक वर्षात लाभार्थी असूनही धान्य न मिळाल्याने ग्रामसभेत याबाबत उहापोह केला. पण गांभीर्याने न घेतल्याने त्याच दिवशी सायंकाळी त्यांचा ताणतणावात मृत्यू झाला. लाभार्थी असूनही धान्यअभावी त्यांचा भूकबळी गेला. त्यानंतर तहसीलदार यांच्या अहवालानुसार परवाना रद्द केला आहे. पण शासनस्तरावर परवाना देण्याची कार्यवाही सुरु आहे. तो पुन्हा वरील संस्थेस परवाना देण्यात येवू नये, अशा संतप्त भावना आदर्की ग्रामस्थांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमोर व्यक्त करत निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द या दोन्ही गावांसाठी एफपीएस आयडी १५२७0१७00३५३ निष्णाई देवी ग्राहक सहकारी संस्थेचे चेअरमन सौ. निंबाळकर यांनी आपल्या वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून धान्याचा अपहार केला आहे. अगदी मयत व्यक्तींच्या रेशनकार्डमध्ये आपल्या सोयीची नावे घातली आहेत. तर काही लाभार्थी व्यक्तीच्या रेशनकार्डमध्ये सोयीचे नाव घालून २0१0 पासून मिळणारे धान्य लाभार्थीला दिलेच नाही. कोरोनाच्या काळात तर मोठ्या प्रमाणात लाभार्थीच्या नावाने आलेले धान्यही दिले नाही. हजारो क्विंटल धान्याच्या अपहाराबाबत प्रत्यक्ष शहानिशा फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी काही महिन्यापूर्वी येवून केली. त्यावेळी ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर संबंधित दुकानामधील आनंदाचा शिधामधील साखर, डाळ व इतर वस्तू कुजलेल्या स्थितीत असल्याचे आढळून आल्यानंतर त्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करत अहवाल दिला. त्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित दुकानाचा परवाना हा आठ दहा महिन्यापूर्वी रद्द केला.
मात्र, काही दिवसांपूर्वी संबंधित दुकानदार यांनी आयुक्त कार्यालय पुणे येथे जावून परवाना मिळवला आहे. या चर्चेने हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुरवठा शाखेत येवून संतप्त भावना व्यक्त केल्या. भूकबळी घेणाऱ्याला अजूनही न्याय तर नाहीच पण शासन जर भ्रष्टाचारी व्यवस्थेला पुन्हा परवानगी देण्याच्या विचाराधीन असेल किंवा दिला असेल तर आदर्की ग्रामस्थ कदापि ते सुरू होऊ देणार नाही. यासाठी साम, दाम, दंड अशा सर्व नीतीचा अवलंब करणार आहेत. यामध्ये अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील.
या निवेदनावर अरविंद धुमाळ, संतोष सुळ, सचिन पोळ, तानाजी बोडके, अक्षय पवार, सुधाकर भोसले, राजू काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
धान्य परवान्याची अजून कोणतीही ऑर्डर नाही
निष्णाई देवी ग्राहक सहकारी संस्थेच्या नावावरील आदर्की बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबीत करण्यात आला आहे. धान्य अपहार प्रकरणातील आनंदाचा शिधाचा दंड पावणेदोन लाखाचा अद्यापही भरलेला नाही. या दुकानाच्या परवान्याबाबत नव्याने आजपर्यंत कोणतीही ऑर्डर आमच्यापर्यंत आली नाही. आपल्या भावना आम्ही समजू शकतो. - भारतकुमार तुंबडे,सहाय्यक पुरवठा अधिकारी, सातारा.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |