दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी सकस चारा व्यवस्थापनाबाबत काळोशी येथे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम

by Team Satara Today | published on : 11 October 2026


सातारा : पशुवैद्यकीय चिकित्सालय, परळी अंतर्गत सर्जा-राजा गोशाळा व खिलार गोशाळा, काळोशी, ता. सातारा येथे दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याबाबत प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समीर बोरकर, प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, पुणे विभाग, तसेच  डॉ. दिनकर बोर्डे , जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. नितीन मगर, डॉ. प्रवीण पवार, डॉ. विनोद पवार, तसेच सर्व तालुक्यांचे सहाय्यक आयुक्त, विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य व दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे, उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करणे, चारा साठवणूक व संवर्धन करणे आणि पशुधनासाठी संतुलित आहाराचे नियोजन करणे यांचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले. दुष्काळाच्या काळात चारा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन, चाऱ्याची नासाडी टाळणे आणि सकस आहाराची उपलब्धता सुनिश्चित करणे हे पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता टिकविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक. दुष्काळी परिस्थितीत चारा व्यवस्थापन व चारा संवर्धनाचे महत्त्व, पशुधनासाठी संतुलित आहाराचे नियोजन,चाऱ्याची नासाडी टाळून उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, पशुधनाचे आरोग्य व दूध उत्पादन टिकविण्यासाठी पशुपालकांना मार्गदर्शन इत्यादी उपक्रम यावेळी घेण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवा संकल्प अभियानाअंतर्गत लोणंद येथे नव चेतना बाल मेळावा उत्साहात; महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड हेल्पलाईनबाबत सविस्तर माहिती
पुढील बातमी
मराठीचा अभिमान जपत ज्ञान व कौशल्यातून जागतिक झेप घ्या - प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, रहिमतपूरच्या बाबासाहेब माने महाविद्यालयात मराठी भाषा सन्मान दिन साजरा

संबंधित बातम्या