कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली गावाच्या हद्दीत पहाटे पाचच्या दरम्यान रेल्वे गेट क्र. ९७ मधून अजमेर एक्सप्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक झाली, असा संदेश गेटमनकडून कराड रेल्वे स्टेशनला प्राप्त होताच, रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलीस व संबंधित यंत्रणेची तारांबळ उडाली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोपर्डे हवेली येथील पावक्ता परिसरानजीक असलेल्या रेल्वे गेट नं. ९७ वर पहाटे साडेपाच वाजता मोठा आवाज झाला व पाठोपाठ रुग्णवाहिका आणि पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजाने स्थानिकांच्या मनात धडकी भरली. दरम्यान, पुण्याकडून मिरजकडे जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक दिल्याची माहिती गेटमन नरेंद्र मीना यांनी कराड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर अमरिश कुमार यांना दिली. यानंतर स्टेशन मास्तर यांनी ही माहिती रेल्वे सुरक्षा बल, रुग्णवाहिका व स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवली.
माहिती मिळताच रेल्वे प्रशासन अलर्ट झाले व आर.पी.एफ, सिग्रल विभाग, टेलिकॉम, इंजिनिअरिंग, टी.आर.डी विभागातील अधिकारी गेट नं. १७ वर तातडीने धाव घेतली आणि घटनास्थळी पाहणी करून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता, प्रत्यक्ष अपघात झाला नसून अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अतिरिक्त विभागीय सुरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात आल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्रत्यक्ष घटना घडल्याचे भासवण्यासाठी पुण्यावरून मिरजकडे जाणारी अजमेर एक्सप्रेस मॉक ड्रिल दरम्यान गेट नंबर ९७ वर जवळपास पाऊण तास थांबवून ठेवण्यात आली होती. जेणेकरून रेल्वे अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य लक्षात यावे व घटनास्थळी काहीतरी अपघात झाला आहे, असे वाटावे यासाठी अजमेर एक्स्प्रेस थांबवून ठेवली होती.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |