सातारा : सेवा संकल्प अभियान आणि पोषण माह यांचे औचित्य साधून सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना आहार व पोषणाबाबत मार्गदर्शन करून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.
किशोरवयीन मुलींनी दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक व संतुलित आहाराचा समावेश करणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे तसेच आरोग्याची काळजी घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या वाढीच्या वयात पोषणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत स्तनदा मातांना गृहभेटी देऊन माता व बालकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली. बालकांच्या योग्य वाढीसाठी मातांचे पोषण, स्तनपान आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
पालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण, स्वच्छता, आरोग्य आणि योग्य आहाराचे महत्त्व याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुली, माता, बालकांचे पालक आणि नागरिकांमध्ये पोषण व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण व आरोग्याबाबत सातारा शहरात जनजागृती; किशोरवयीन मुलींना आहारविषयक मार्गदर्शन; स्तनदा मातांची गृहभेट
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा