एका महिलेचे पर्समध्ये ठेवलेल्या दोन लाखांच्या गंठणाची चोरी; अज्ञाता विरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : सुमारे दोन लाखांच्या गंठणाची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 ते 19 दरम्यान कोडोली येथील एका महिलेचे पर्समध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाचे व एक लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.  याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारूच्या दुकानातून दारूसह रोख रकमेची चोरी; दोन अज्ञात चोरट्यांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

संबंधित बातम्या