मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 November 2024


सातारा : वडूथ ता.सातारा गावच्या हद्दीत हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित साबळे, विजय साबळे, मयुर साबळे, प्रतीक पोतदार, सौरभ साबळे, अभिजीत साबळे (सर्व रा.शिवथर ता.सातारा) यांच्या विरुध्द मंगेश श्रीरंग कदम (वय 46, रा. बसाप्पाचीवाडी ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 5 नोव्हेबर रोजी ही घटना घडली असून लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
पुढील बातमी
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक

संबंधित बातम्या