सातारा : फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथे पाइपने मारहाण करून एका सलून व्यावसायिकास गंभीर जखमी केल्याची घटना दि. २६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत नितीन शिवाजी कर्वे (वय ४८, व्यवसाय सलून, रा. फडतरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शैलेश दशरथ फडतरे (रा. होळकरवाडी, ता. फलटण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फडतरवाडी येथील दवाखान्याजवळ फिर्यादी यांना आरोपीने तोंडावर हाताने मारहाण केली. तसेच दोन्ही हातांच्या मनगटावर पाइपने मारून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहेत.
फडतरवाडी येथे सलून व्यावसायिकास पाइपने मारहाण; एकावर गुन्हा दाखल, व्यावसायिक गंभीर जखमी
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा