मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मुंबई तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष बेरचजेचं गणित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे माजी नगरसेविका तथा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण मुंबईत अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर आता गीता गवळी या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली आहे. गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारंसघातून लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या गणितावरून गीता गवळी मशालीवर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. अरुण गवळी यांनी स्थापन केलेला अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नगरसेविका होत्या. त्याचप्रमाणे आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील गीता गवळी होत्या. सध्या भायखळा विधानसभेत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाकडून आणखी पदाधिकारी देखील इच्छुक आहेत.
अरुण गवळी सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणी अरुण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अरुण गवळी 2007 पासून अटकेत आहे. अरुण गवळी गेल्या 17 वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यामुळे अनेकदा अरुण गवळी याची जेलमधून सुटका करण्यात येईल, अशी चर्चा वारंवार समोर येत असते. लोकसभा निवडणुकीवेळीदेखील तशी चर्चा समोर आली होती. लोकसभा निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी महायुतीने अरुण गवळी याची जेलमधून सुटका करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा त्यावेळी समोर आली होती. पण तसं काही घडलं नाही.
दरम्यान, अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे. लालबाग, परळ, करीरोड, भायखळा, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात अरुण गवळीचा मोठा चाहता वर्ग आहे. या परिसरात सर्वसामान्यांमध्ये अरुण गवळी याच्याविषयी आदर आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून अरुण गवळी याच्या नावाचा किंवा त्याच्या कुटुंबियांची मदत घेण्याचा प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत केला जातो. अरुण गवळी याने स्वत: 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याचा पराभव झाला होता. पण त्याला 92 हजार मते मिळाली होती. याशिवाय अरुण गवळीचा अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष आहे. याच पक्षाचे मुंबई महापालिकेत नगरसेवकही निवडून येतात. त्यामुळे या मतांचा विचार प्रत्येक पक्षांकडून केला जातो.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |