संभाजीनगर-कोडोली परिसरात ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 08 July 2026


सातारा : सातारा शहरातील संभाजीनगर-कोडोली परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ७) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

मयताचे नाव महेश शंकर घाडगे (वय ३५, मूळ रा. मुळरोशी, पोस्ट लांबवडे, ता. पाटण, जि. सातारा, सध्या रा. प्लॉट क्र. ३०२, सुमननगरी, संभाजीनगर, कोडोली, सातारा) असे आहे.

याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय कुऱ्हाडे यांनी बीडी क्रमांक २७२/२०२६ व एमएलसी क्रमांक ७२६५/२०२६ अन्वये सातारा शहर पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक नोंदीनुसार, महेश घाडगे यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार गुरव पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात पावसाचा जोर आजही कायम; जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले; महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ४०७ मिलिमीटर पाऊस
पुढील बातमी
फोन परत न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण;सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या