कौटुंबिक जबाबदाऱ्या, ऑफिस आणि घरकामामुळं महिलांचं मानसिक आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललं आहे. कामाच्या व्यापामुळे महिला स्वतःच्या आरोग्यकडं सर्रास दुर्लक्ष करतात. यामुळे बऱ्याच महिला डिप्रेशनच्या आहारी जात आहेत. सतत विचारांचा कल्लोळ मनामध्ये गोंधळ निर्माण करतो. ज्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. त्याचा थेट परिणाम आरोग्यसह कुटुंबावर देखील होतो. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं हे समजत नाही. चला तर जाणून घेऊया दिवसभराचा हा स्ट्रेस कसा कमी करावा.
• नियमित मेडीटेशन करा : रोज न चुकता मेडीटेशन केल्यास तुम्ही शांत आणि निरोगी राहू शकता. मानसिक ताणतणावापासून दूर राहायचं असेल तर नियमित मेडीटेशन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ध्यानधारणा आणि योगासनांमुळे आपल्याला मानसिक शांती मिळते.
• छंद जोपासा : नियमित अर्धा तास किंवा आठवड्यातील एक दिवस तरी आपल्या छंदासाठी राखीव ठेवा. यामुळं तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्ही ज्या कामात कुशल आहात ते करा. जर लिहायला आवडत असेल तर रोज आपल्या भावना लिहत चला. यामुळं ताण कमी होतो शिवाय तुम्ही रिफ्रेश देखील व्हाल.
• दहा मिनिटं गाणी ऐका किंवा डान्स करा : आपल्या बहुतांश समस्या सोडवणारी एक गोष्ट म्हणजे डान्स करणं होय. नियमित डान्स केल्यास दिवसभराचा स्ट्रेस निघून जातो. यामुळे मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्य देखील सुधारतं. वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी डान्स महत्त्वाची भूमिका बजावते.
• नाही म्हणायला शिका : समोरच्या व्यक्तीला राग येईल म्हणून आपण आपल्या मागे नको असलेले काम लावून घेतो. परंतु, आपली नाही न म्हणण्याची सवय आपलं ताण वाढवते. त्यामुळे सर्वात आधी नाही म्हणणे शिका.
• कुटुंब, मित्र- मैत्रिणींशी गप्पा करा : शक्य असल्यास ऑफिसचं ताण ऑफिसमध्ये विसरून घरी परता. यामुळे तुमची कौंटुंबिक बॉन्डिग चांगली होईल. अनेकदा आपण कामाचा ताण कुटुंबियांवर काढतो. त्यामुळे आपलं कुटुंब न कळत दुखावल्या जाते. तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत काही काळ घालवा. यामुळे तुम्ही शांत राहाल. ऑफसच्या ताणावाव्यतीरिक्त त्यांच्याशी दुसऱ्या विषयांवर बोला.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |