सातारा : पाडळी (ता. जि. सातारा) येथील बसस्थानक परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
याबाबत संगीता माणिक ढाणे (वय ५०) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दि. ४ रोजी सकाळी ११ ते दि. ८ रोजी दुपारी एक या कालावधीत ही घटना घडली. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटातील साडेतीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अडीच ग्रॅमची रिंग, सव्वादोन ग्रॅमची कानातील रिंग, चांदीचे तीन जोड पैजण, चांदीची अन्नपूर्णा मूर्ती आणि सात हजार रुपये रोख असा मुद्देमाल नेला.
या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फौजदार पी. पी. शिंदे तपास करीत आहेत.
पाडळीत बंद घर फोडून ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
by Team Satara Today | published on : 10 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा