सातारा : सातारा शहरातील अजंठा चौक परिसरात दुचाकीवर कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत झाले. या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पंकज शिवाजी नावडकर (वय २३, रा. सोनगाव, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. १७ जानेवारी रोजी अजंठा चौकात दुचाकी कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून निखिल जगदीप पवार व पृथ्वीराज भिमराव साळुंखे (दोघे रा. अमरलक्ष्मी स्टॉप परिसर, सातारा) यांनी पंकज नावडकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच शिवीगाळ व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.