डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबासाठी विश्वास पाटील यांच्यासह साहित्यिकांचा पुढाकार; मुलीच्या शिक्षणासाठी काढलेले वडिलांचे फेडले कर्ज

by Team Satara Today | published on : 18 August 2026


सातारा : साहित्यिक समाजाचा आरसा असतो आणि त्यांचे समाजाप्रती दायित्व असते या गोष्टींबद्दल नेहमीच चर्चा होते. मात्र, अशा प्रकारचे कृतिशील आचरण करून ‘पानिपत’कार आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील तसेच साहित्यिक राजीव श्रीखंडे आणि त्यांच्या काही साहित्यिक मित्रांनी नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी फलटण येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी मुलीच्या शिक्षणासाठी काढलेल्या बँकेच्या कर्जाची भरपाई करून आपल्यातील सहृदयता दाखवून दिली आहे.

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर मोठी चर्चा रंगली. राजकीय पक्षांनीही आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली. डॉ. मुंडे यांच्या वडिलांनी अतिशय कष्टातून मुलीला शिकवले होते. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी एका बँकेतून मोठे कर्ज घेतले होते. स्वतःची मुलगी गमावल्यावर हे कर्ज कसे फेडायचे असा त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला होता.

साहित्यिक विश्वास पाटील हे व्याख्यानाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या घरी भेट दिली. तसेच याबाबत सविस्तर माहिती घेतली. तेव्हा वडिलांनी शिक्षणासाठी कर्ज घेतल्याचे समजले. ते कर्ज तसेच होते. त्यानंतर पाटील यांनी साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्यासह इतर काही साहित्यिक मित्रांशी चर्चा केली. दोघांनीही पुढाकार घेऊन आपल्या काही साहित्यिक मित्रांना मदतीचे आवाहन केले. सर्वांनीच या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे या सर्वांच्या मदतीने १७ ऑगस्टला बँकेच्या संबंधित शाखेत कर्जाच्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यात आला. याबाबत कुठेही गवगवा करण्यात आला नाही.

फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. मूळच्या बीडच्या असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी अतिशय कष्टातून मुलीला शिकवलं होतं. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी स्टेट बँकेतून कर्ज घेतलं होतं. स्वतःची मुलगी गमावल्यावर हे कर्ज कसे फेडायचे असा त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला होता. त्यांच्या मदतीसाठी साहित्यिक विश्वास पाटील आणि काही साहित्यिक मित्र पुढे आले. त्यांनी 17 ऑगस्ट रोजी स्टेट बँकेच्या वडवणी शाखेत असलेलं कर्ज फेडलं. या साहित्यिकांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नायलॉन मांज्यावर बंदी असतानाही साखरवाडी परिसरात सर्रास वापर; प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेण्याची गरज
पुढील बातमी
पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?; कपिल सिब्बलांनी विचारला थेट सवाल

संबंधित बातम्या