सातारा जिल्ह्यात विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता ; नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 23 May 2026


सातारा : हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संतोष पाटील सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

1. विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये.

2. इलेक्ट्रिक पोल पासून शक्यतो दूर रहावे.

3. पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडा.

4. इलेक्ट्रॉनिक/उपकरणे बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा.

5. वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा.

6. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याचे ज्येष्ठ मृदंगाचार्य मदन कदम यांना संतकृपा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
पुढील बातमी
मान्सूनची जोरदार प्रगती ; भारतीय किनारपट्टीजवळ आला, दोन ते तीन दिवसांत केरळ, तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर

संबंधित बातम्या