सातारा : संगमनगर ते एमआयडीसी मार्गावर हॉटेल शीतलजवळ डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून संबंधित डंपर चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सारिका अविनाश राजे (वय ४०, रा. श्रीनगर कॉलनी, संगमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पती अविनाश अनंत राजे हे दुचाकीवरून एमआयडीसीकडे जात असताना हॉटेल शीतल परिसरात डंपरने जोरदार धडक दिली.
या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.