फलटण : अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी एका विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 12 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती फलटण येथील गेटच्या समोरील रस्त्यावर परवेज समीर पठाण रा. कसबा पेठ, फलटण हा अवैधरित्या लोखंडी तलवार बाळगून असताना सापडला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भोसले करीत आहेत.