साहिल जाधवने सातार्‍याचे नाव सातासमुद्रापार झळकावले - ना. शिवेंद्रसिंहराजे; सुवर्णपदक विजेत्या साहिलचा केला सन्मान

by Team Satara Today | published on : 07 October 2026


सातारा : आपल्या सातार्‍याचा सुपुत्र, तिरंदाज साहिल जाधव याने जिद्द, मेहनत, कष्ट आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आशियाई स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून सुर्वणपदकाला गवसणी घातली. साहिलने मिळवलेल्या यशाचा एक सातारकर म्हणून सार्थ अभिमान आहे. साहिलने सातार्‍याचे नाव सातासमुद्रापार झळकावले असून याबद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या साहिल जाधव याच्या निवासस्थानी भेट देऊन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्याचा विशेष सन्मान करून त्याचे अभिनंदन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक फिरोज पठाण, सुशांत महाजन, हरीश पाटणे, आप्पा घुले यांच्यासह विविध मान्यवर आणि जाधव कुटुंबीय उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजेंनी साहिलशी मनमोकळा संवाद साधत साधून आशियाई क्रीडा स्पर्धेतील त्याच्या अनुभवांबाबत आणि उल्लेखनीय कामगिरीबाबत चर्चा केली. त्याने घेतलेल्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करून त्याच्या पुढील यशस्वी क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनावर हायकोर्टाने सरकारला खडसावलं; 'विद्यार्थी समाजविघातक समाजविघातक घटक नाहीत'
पुढील बातमी
फर्न हॉटेल ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गावर 'नो पार्किंग’ची अंमलबजावणी, सर्विस रोडवर अवजड वाहनांना ब्रेक’; बेकायदा पार्किंग केल्यास कारवाई,

संबंधित बातम्या