मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल Shefali Jariwala हिचे शुक्रवारी रात्री वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले. तिच्या सोसायटीचे वॉचमन शत्रुघ्न यांनी आदल्या रात्री काय झाले, याविषयी माहिती दिली. शेफालीला रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले, असे त्यांनी सांगितले. पोलिसांना रात्री एक वाजता याविषयी माहिती मिळाली. सुरुवातीला कार्डिअॅक अरेस्टने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते, मात्र घरात ती मृतावस्थेत आढळल्याचे बोलले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी शेफाली जरीवाला आणि तिचे पती पराग त्यागी त्यांच्या कुत्र्यासोबत सोसायटीच्या आवारात फिरताना दिसले होते. शुक्रवारी शेफालीचे निधन झाल्याचे ऐकून त्यांना विश्वास बसला नाही. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली यांचा मृतदेह अंधेरी येथील त्यांच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये आढळला. शवविच्छेदनास करण्यासाठी मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ती काही दिवसांपासून ब्युटी ट्रीटमेंट घेत असल्याचीही माहिती समोर आली आहे.सोसायटीचे सुरक्षा रक्षक शत्रुघ्न यांनी शुक्रवारी रात्री घडलेल्या घटना सांगितल्या. "रात्री साधारण 10.30 वाजता शेफालीजी यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्याआधी, रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांचे पती पराग त्यागी बाईकवरुन सोसायटीत आले होते. मीच गेट उघडले होते, असे ते म्हणाले.
Shefali Jariwala Death News समजल्यावर काय घडले, याबद्दल शत्रुघ्न म्हणाले की, एक माणूस मोटारसायकलवरून आला, कदाचित तो त्यांचा मित्र असावा. त्याने शेफालीच्या निधनाची माहिती दिली. आदल्या दिवशीच तिला पाहिल्यामुळे माझा त्यावर विश्वास बसला नाही, असंही शत्रुघ्न म्हणाले.