09:01pm | Nov 06, 2024 |
उंब्रज : शरद पवार राजकीय जीवनात आमचे विरोधक आहेत. मात्र ते नेहमी एक मंत्र देतात की भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते. आता पवार साहेबांना सांगा, उत्तर कराड मधील तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे. मनोज दादा आता हे नुसते उमेदवार नाहीत, तर ते कराड उत्तरच्या परिवर्तनाचा जबरदस्त चेहरा आहेत. त्यांना विधानसभेत पाठवा. पाचच वर्षात २५ वर्षाचा बॅंकलाॅग भरुन काढतो. आपल्या आशिर्वादाने सरकार आले तर कर्जमाफीही करतो, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पाल, ता. कराड येथे मल्हारी म्हाळसाकांत यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री यांनी श्रीफळ वाढवून केला. त्यानंतर आयोजित सभेत त्यांनी शरद पवारासह महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, अशोकराव गायकवाड तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत कराडला ऐतिहासिक महत्त्व आहे. दुर्दैवाने गेल्या पंचवीस वर्षात उत्तर कराड ज्या प्रकारे विकासाची अपेक्षा ठेवतो, ज्या प्रकारे परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो, ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. वारंवार तुम्ही येथून जो लोकप्रतिनिधी पाठवता त्यांच्याकडून ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. उत्तर कराडमध्ये मनोज दादा, धैर्यशील दादा यांच्यात होणारी मत विभागणी टाळण्यासाठी आपण एकत्र आलो. यामध्ये कुणाला तरी त्याग करावा लागला. मात्र सर्वांनी मिळून मनोजदादांचे नाव पुढे केले. पण मनोजदादा आता हे नुसते उमेदवार नाहीत, तर कराड उत्तर च्या परिवर्तनाचे जबरदस्त चेहरा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुती विकासाच्या बाबतीत निधी देण्यात कुठेही मागे पडणार नाही. अनेक जिल्ह्यातील दुष्काळी चेहरा पुसून सिंचन योजना राबविल्या आहेत. या परिसरातील मागणीचा विचार करुन तारळीचे पाणी शंभर मीटर हेड करून प्रत्येकाच्या शेतीपर्यंत पाण्याचा थेंब थेंब देण्याचे काम आम्ही करू, कराड उत्तरच्या कार्यकर्तांनी आमदार नसताना मतदार संघात 990 कोटी रुपयांचा विकास निधी आणला. ते सत्तेत आले तर पाच वर्षात 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढतील. सोबतीला खासदार उदयनराजे आहेतच. त्यांच्या एका शब्दावर पंतप्रधान मोदीजी तिजोरी खुली करून देतील. महायुती सरकारने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना सिंचनासाठी दहा हजार कोटी दिले आहेत. शेतकऱ्यांचे विज बिल माफ केले आहे. तर येणाऱ्या पाच वर्षाची बिल माफ होतील. पुढील दोन वर्षानंतर राज्यात 24 तास 365 दिवस शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे. शेतकऱ्यांना रात्री पाणी पाजण्याचा त्रास यापुढे होणार नाही. शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उत्पन्नावर आकारण्यात येणारा इन्कम टॅक्स यापुढे लागणार नाही. आपल्या आशीर्वादाने सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.महाविकास आघाडीचे नौटंकीबाज नेते म्हणत होते लाडकी बहीण योजनेतून काही मिळणार नाही. ते तुमचे सावत्र भाऊ कोर्टात गेले व ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही ठाम आहोत. ही योजना बंद न पडता मोठ्या जोमाने चालू राहील.खासदार उदयनराजे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसने कायम निवडून दिले. त्यामुळे इथला विकास थांबला आहे. लोकांच्या भल्यासाठी चांगल्या विचारांनी एकत्र येतात तेव्हा त्याला महायुती म्हणतात आणि आघाडी म्हणजे सत्ता व खुर्चीसाठी एकत्र आलेले लोक. कराड उत्तर मतदार संघाला नेहमी पडलेला प्रश्न सामंजस्याने मिटवला आहे. कारण उत्तर मध्ये एकास एक उमेदवार देऊन ही लढाई आता एकतर्फी केलेली आहे. येथील जनतेने मनोज घोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आजपर्यंत सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. परंतु या किल्ल्याचे बुरुज ढासळले आहेत. आता उत्तरचा दरवाजा फक्त राहिला आहे. तो दरवाजा आपल्याला तोडायचा आहे. ते काम उत्तरची जनता करेल. तसेच सातारा तालुक्यातील जनता ठामपणे मनोज घोरपडे यांच्या पाठीमागे उभे राहील, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. लाडक्या बहिणींनी दाजी वर लक्ष ठेवून त्यांना त्यांना ठणकावून सांगा यावेळी तुमचे ऐकणार नाही.आमदार जयकुमार गोरे म्हणाले, गेल्या 25 वर्षाचे संकट कराड उत्तरच्या मुळावर येऊन बसले आहे. ते दूर करण्यासाठी मतदारांनी तयार राहावे. जिल्ह्यात युतीचे सहा आमदार होतेच. या वेळेला आणखीन दोन घेऊन येत आहे. पंचवीस वर्षे आमदार असून मतदारसंघातील शामगावला हे पाणी देऊ शकले नाहीत व तेथील जनतेला सांगतात मला ते शक्य नाही. असा आमदार काय कामाचा? अवताला बसणारा बैल बदला, असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
सदाभाऊ खोत यांनीही बाळासाहेब पाटलांवर टीका केली. मी सहा वर्षे विधान परिषदेत आहे. या सहा वर्षात तुमचा आमदार सहा वाक्य बोलला नाही. मुक्या प्राण्याला तुम्ही निवडून दिलाय. जनतेचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न विचारणारा प्रतिनिधी पाहिजे, अशी टीका खोत यांनी केली. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शंकरराव शेजवळ, विक्रमबाबा कदम, चित्रलेखा माने कदम, संपतराव माने, सचीन नलवडे, भरत पाटील, संपतराव जाधव, महेश बाबा जाधव, उमेदवारी अर्ज मागे घेवून महायुतीला पाठींबा दिलेले उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |