भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून एकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला

जखमी जावली तालुक्यातील; संशयित आरोपीच्या तपासासाठी भुईज पोलीस पथक रवाना

by Team Satara Today | published on : 29 November 2024


सातारा : भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून एकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. जखमी जावली तालुक्यातील असून संशयित आरोपीच्या तपासासाठी भुईज पोलीस पथक रवाना झाले आहे.

याबाबत भुईंज पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी मयुर विकास जाधव वय २६ वर्षे रा. शेते ता. जावली हा आपले दोन सहकारी जुबेर शेख रा. कुडाळ ता जावली व अजय महामुलकर ता. जावली यांच्या बरोबर भुईज येथे आला होता. सायंकाळी साडे सहाचे दरम्यान या तिघांना एका स्विफ्ट कारमधून आलेल्या इसमांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना गाडीत बसवले व त्यांना वाठार ता. कोरेगाव नजीक आदर्की गावच्या हद्दीत यातील दोघांना गाडीतून ढकलून दिले. तत्पुर्वी त्यांच्यात झालेल्या वादावादी दरम्यान जुबेर शेख याला चाकूने भोकसण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादी मयुर यास दहिवाडी ता. माण येथे नेण्यात आले. व तेथे बंद घरात डांबून ठेवले होते. यातून मयुरने स्वतःची सुटका करत तेथून घरी परतला व जखमी जुबेर शेख याची चौकशी करत त्याला पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळाली.घडलेल्या प्रकाराची सुरुवात भुईज येथून झाल्याने शुकवारी सकाळी भुईज पोलीस स्टेशनमध्ये मयुर याने तकार दाखल केली. दिवसभर भुईंज पोलीसांनी तपास यंत्रणा राबवून संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश मिळाले नाही.या गुन्हयाची नोंद भुईज पोलीस स्टेशन मध्ये झाली असून अधिक तपास सपोनि रमेश गर्जे व गुन्हे प्रकटीकरण विभाग करीत आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे अखेर उलघडले गूढ
पुढील बातमी
सदरबझार येथून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या