राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी नरेश देसाई

by Team Satara Today | published on : 15 November 2025


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी पाटण तालुक्यातील युवानेते नरेश देसाई यांची नुकतीच निवड करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नुकतेच श्री देसाई यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

नरेश देसाई यांनी गेल्याच महिन्यात आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. देसाई हे पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील जाणकार नाव असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी देवून त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी दिली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते खा.शरद पवार, खा. सुप्रियताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. रोहित पवार, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, एल.एम. पवार, देवराज पाटील, डॉ. नितीन सावंत,अरविंद घाडगे, किसनराव भिलारे, राजाभाऊ निकम, उद्धव बाबर, विजय बोबडे, पारिजात दळवी, व महिलाध्यक्षा संजना जगदाळे, समिंद्रा जाधव,आदि मान्यवरानी  श्री.देसाई यांचे अभिनंदन केले.


कोट 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मला राज्यस्तरावर काम करण्याची संधी दिली असून या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांचे संघटन करून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे.

- नरेश देसाई, प्रदेश सरचिटणीस


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरी पोलिसांनी १५ लिटरच्या ताडीच्या बाटल्या केल्या जप्त
पुढील बातमी
पाडळीतील बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा उघड; एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांची कामगिरी

संबंधित बातम्या