सातारा : सातारा शहर पोलिसांनी गहाळ झालेले चार लाख रुपये किमतीचे वीस मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. याकरिता विशेष शोध मोहीम राबवण्यात आली होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ते मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. या कारवाईची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी चोरीला गेलेल्या मोबाईल संदर्भात विशेष तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक, सातारा शहर पोलीस सीईआर पोर्टल तसेच इतर तांत्रिक बाबीच्या आधारे महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून चोरीला गेलेले, गहाळ झालेले मोबाईल तपास मोहिमेच्या माध्यमातून हस्तगत करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्मार्टफोन संबंधित मालकांना परत देण्यात आले.
या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, सुधीर मोरे, सुधीर भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्र माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला.