सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा ते रहिमतपूर रस्त्यावर परांजपे कंपनीच्या समोर दुचाकी चालकाने भरधाव वेगात एका दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील एकास गंभीर दुखापत झाली. ही घटना दि. 14 जुलै रोजी घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात मनिषा पांडुरंग बर्गे (रा. आंबेवाडी, पो. माजगाव, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, शशिकांत गणपत शितोळे (रा. आंबेवाडी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मनिषा बर्गे या दुचाकीवर पाठीमागे बसल्या होत्या तर त्यांचा मुलगा समाधान हा दुचाकी चालवत होता.