सातारा : दि ४ रोजी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुहास देवानंद कारंडे (वय ४२ रा. तामजाईनगर) हे त्यांच्या गाडीवरून बसप्पा पेठ येथून घरी जात असताना अक्षय संजय कारंडे आणि संजय लक्ष्मण कारंडे (दोघे रा. करंजे सातारा) यांनी त्यांची गाडी अडवून तुला किती वेळा सांगायचे, दुकान बाहेर लावायचे नाही असे म्हणून धक्काबुक्की केली. यावेळी सुहास कारंडे यांना हाताने मारहाण करत बाजूला पडलेली वीट त्यांच्या हातावर आणि डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करत आहेत.
दुकान लावण्याच्या कारणावरून दोन जणांकडून तामजाईनगरच्या एकाला मारहाण
by Team Satara Today | published on : 07 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा