उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील झाशीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यसाठी जाणाऱ्या झाशीच्या वीरंगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत शेकडो प्रवासी गंभीर जखमी झाले, अनेकजण रुळावर तर अनेक जण प्लॅटफॉर्मवर पडल्याने एकच खळबळ उडाली होती. सोमवारी रात्री (13 जानेवारी) रात्री उशिरा हा प्रकार घडला. सुदैवाने रेल्वे चालकाने वेळीच ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली, त्यामुळे मोठा अपघात टळला.
महाकुंभासाठी, रेल्वेने झाशी आणि प्रयागराज दरम्यान रिंग ट्रेन सुरू केली आहे. महाकुंभासाठी जीआरपी आणि आरपीएफ अधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थाही करण्यात आली होती. सोमवारी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास, रिंग रेल प्रयागराज आणि ओरई मार्गे झाशीच्या वीरंगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानकावर पोहोचली. इथे ट्रेन रिकामी झाली. आता ही रिंग रेल्वे सकाळी 8.10 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून प्रयागराजला जाणार होती. त्याआधी ट्रेन साफसफाई इत्यादींसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर नेली जात होती. पण त्याचवेळी ही घटना घडली, त्यावेळी रेल्वे स्थानकावर पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने भाविकांची एकच झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरी झाली.
जेव्हा ट्रेन साफसफाईसाठी जात असताना महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांना ही ट्रेन प्रयागराजला जात असल्याचा गैरसमज झाला. गैरसमजाची परिस्थिती अशी निर्माण झाल्यामुळे प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी घाई करू लागले. चेंगराचेंगरी इतकी भयानक होती की अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडले तर काही रुळांवर पडले. हे पाहून एकच गोंधळ उडाला. प्रवासी स्वतः एकमेकांना वाचवण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला.
प्रसांगवधान राखत रेल्वे चालकाने ब्रेक लावला आणि मोठा अपघात टळला. गोंधळ उडाला तेव्हा प्लॅटफॉर्मवर एकही पोलिस कर्मचारी नव्हता. यामुळे प्रवासीदेखील गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. चालकाने योग्य वेळी ट्रेन थांबवल्याने मोठा अपघात टळला. ट्रेन थांबल्यानंतर, त्यांना पटवून देण्यात आले आणि त्यांना ट्रेनमध्ये चढण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेमुळे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेचा भंग झाला आहे. घटनेच्या वेळी पोलिसांची अनुपस्थितीमुळेही अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम, महाकुंभ, पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाने सुरू झाला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 80 लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केले होते, जे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1.5 कोटींच्या वर गेले. महाकुंभासाठी 3 हजार विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. कानपूर, वाराणसी ते गोरखपूर पर्यंत विशेष बसेस देखील धावत आहेत.
सोमवारी प्रयागराजमध्ये सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगमात स्नान करण्यासाठी छत्तीसगडमधील भाविकांना रेल्वेने चार मेळा विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या गाड्या 19 आणि 21 जानेवारी आणि 15 आणि 17 फेब्रुवारी रोजी प्रयागराजसाठी धावतील.
या विशेष ट्रेनद्वारे, रायपूर, रायगड, बिलासपूर, दुर्ग, विशाखापट्टणम ते पंडित दीनदयाळ उपाध्याय स्टेशन, विशाखापट्टणम, गोरखपूर तसेच दुर्ग-टुंडला या ठिकाणांहून भाविक पवित्र स्नान करू शकतील. रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 08793 दुर्ग-टुंडला कुंभमेळा विशेष ट्रेन 19 जानेवारी रोजी सायंकाळी ७.२० वाजता दुर्ग येथून निघेल आणि सकाळी 8.10 वाजता रायपूर, सकाळी 9 वाजता भाटापारा, सकाळी10 वाजता उस्लापूर, रात्री 11.48 वाजता पेंड्रा रोड येथे पोहोचेल. अनुपपूर, शहडोल, कटनी मार्गे, ती मैहर मार्गे सकाळी8.15 वाजता टुंडला जंक्शनला पोहोचेल, दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जानेवारी रोजी सकाळी ११.१० वाजता प्रयागराज मार्गे.
त्याचप्रमाणे, 08794 टुंडला-दुर्ग कुंभमेळा विशेष गाडी 21 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता टुंडला येथून निघेल आणि दुपारी १ वाजता प्रयागराजला पोहोचेल. ती दुसऱ्या दिवशी, 22 जानेवारी रोजी सायंकाळी5 वाजता दुर्ग स्थानकावर पोहोचेल, मैहर, कटनी, उस्लापूर मार्गे दुपारी 1.50 वाजता, भाटापारा मार्गे दुपारी 2.43 वाजता, रायपूर मार्गे दुपारी 3.30 वाजता.
ट्रेन क्रमांक 08795 दुर्ग-टुंडला कुंभमेळा विशेष 15 फेब्रुवारी रोजी दुर्ग येथून सकाळी ७.२० वाजता सुटेल, रायपूरला सकाळी 8.10 वाजता, भाटापारा सकाळी ९ वाजता, उस्लापूर सकाळी 10 वाजता, पेंड्रा रोडला सकाळी 11.48 वाजता अनुपपूर, शहडोल, कटनी, मैहर मार्गे पोहोचेल. दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.10 वाजता ती प्रयागराज मार्गे 8.15 वाजता टुंडला जंक्शनला पोहोचेल.