01:17pm | Sep 14, 2024 |
सातारा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मागील अनेक वर्षापासून जुनी पेन्शन मागणीसाठी लढा देत आहे. संघटनेच्या विविध आंदोलनात लाखो कर्मचारी उपस्थितीत राहून जुन्या पेन्शनसाठी आपला असंतोष व्यक्त करीत असताना सरकार कोणतेही असले तरी वेळोवेळी मात्र शासनाने फक्त आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांच्या माथी फसव्या एनपीएस, जीपीएस, युपीएस या योजना मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोणत्या नेत्यावर, मंत्र्यावर, आमदारावर व त्यांच्या पक्षावर विश्वास ठेवावा? हा गंभीर प्रश्न कर्मचारी व त्यांच्या परिवारासमोर निर्माण झाला आहे.
येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणारा आहेत आणि त्यात भविष्यातील सरकार निवडुन दिले जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत जुनी पेन्शन लागू करणेबाबत राज्यातील विविध पक्षाची भूमिका काय आहे? हे सर्व कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वाराअधिवेशन सुट्टी दिवशी म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची, सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी रविवारच्या दिवशी अधिवेशनाचे नियोजन केले असून सोमवार व मंगळवार शासकीय सुट्टी आहे. आपल्या प्रश्नासाठी लढताना जुनी पेन्शन संघटनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून सुट्टी दिवशी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एक आदर्श निर्माण केला आहे.
अहिल्यानगर, शिर्डी येथे येत्या १५ सप्टेंबर २०२४ ला 'पेन्शन राज्य महाधिवेशन' आयोजित केले आहे. शासनाने नव्याने लागू केलेली वढर योजना कर्मचाऱ्यांना मान्य नाही. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनातून कोणतीही रक्कम कपात न करता पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन हवी आहे. वढर योजनेमुळे सरकारवर अधिक आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे जुनी पेन्शन शासनाने लागू करावी यासाठी राज्यभरातून लाखो कर्मचारी शिर्डीमध्ये एकवटणार आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रितेश गायकवाड यांनी दिली. या पेन्शन राज्य महाधिवेशनात' शिर्डी येथे राज्यातील लाखो कर्मचारी आपल्या परिवारासह उपस्थित राहून जुनी पेन्शन विषयक विविध पक्षाची पक्षीय भूमिका जाणून घेऊन संघटनात्मक भूमिका घेणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षक या अधिवेशनासाठी जाणार आहेत. त्याचबरोबर अन्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य संपर्कप्रमुख प्रवीण तरटे, राज्य समन्वयक बिराजी लोखंडे, विभागीय उपाध्यक्ष अमोल जाधव, विभागीय कार्याध्यक्ष नवनाथ काशीद तसेच सरचिटणीस अविनाश करपे यांनी यावेळी केले.
अधिवेशन सुट्टी दिवशी अनेक वेळेला संघटनांचे अधिवेशन म्हणजे रजेचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होतो. आपल्या अधिवेशनामुळे कोणत्याही प्रकारे सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारच्या दिवशी अधिवेशनाचे नियोजन केले असून सोमवार व मंगळवार शासकीय सुट्टी आहे. आपल्या प्रश्नासाठी लढताना जुनी पेन्शन संघटनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून सुट्टी दिवशी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एक आदर्श निर्माण केला आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |