अक्षता ढेकळे, प्रांजली धुमाळ यांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

by Team Satara Today | published on : 04 October 2024


सातारा : जिल्ह्यातील वाखरी, ता. फलटण येथील अक्षता आबासो ढेकळे व प्रांजली प्रशांत धुमाळ यांना राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2022-23 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे.

राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासह विविध पुरस्कार दिले जातात. सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कार्थींची निवड करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तर पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन सन 2022-23 या वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सातार्‍यातील हॉकी खेळाडू अक्षता ढेकळे व नेमबाजीतील दिव्यांग खेळाडू प्रांजली धुमाळ यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. प्रांजली धुमाळने जागतिक मूकबधिर नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले होते. यासह अन्य जागतिक शुटींग स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले होते.

अक्षता ढेकळे ही हॉकीतील स्टार खेळाडू आहे. हॉकी महिला वर्ल्डकपमध्येही तिने सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत पदार्पण करणारी महाराष्ट्रातील पहिली खेळाडू म्हणून तिची ओळख आहे. पुरस्काराबद्दल अक्षता ढेकळे व प्रांजली धुमाळ यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साखर खाणे पूर्णपणे सोडले तर शरीराला होतात अनेक फायदे
पुढील बातमी
ग्रामबीजोत्पादन गाव चिंचणेर निंब पर्यटनाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : तहसीलदार नागेश गायकवाड

संबंधित बातम्या