सातारा : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सातारा शहरातील नवीन एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये संजय भिकू गंगावणे रा. अमरलक्ष्मी, संभाजीनगर, सातारा त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रमोद एकनाथ शिंदे रा. बोगदा परिसर, सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले करीत आहेत.