सातारा : एकास मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सागर चंद्रकांत कदम (वय 35, रा.चिंचणेर वंदन ता.सातारा) याने डोक्यात वीट मारुन जखमी केल्याप्रकरणी प्रकाश विठ्ठल कदम (वय 74) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना दि. 25 सप्टेबर रोजी चिंचणेर वंदन येथे घडली आहे.
डोक्यात वीट मारुन जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा