साताऱ्यात बुधवार पेठेतील बारटक्के चौकात चेन स्नॅचिंग; अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 July 2026


सातारा : बुधवार पेठेत चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी दुपारी पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान बारटक्के चौक, बुधवार पेठ, सातारा येथील वृषाली सुरेंद्र बारटक्के यांच्या एस एस इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात अज्ञात व्यक्ती आली. त्या व्यक्तीने सेल विकत घेतल्यानंतर बारटक्के या काउंटर जवळ असलेल्या खुर्चीत बसल्या असताना संबंधिताने त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचे मिनी गंठण गळ्यातून हिसकावून घेऊन त्याच्या मोपेड दुचाकीवरून पळून गेला आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहोड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास अटक; मेढा पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा
पुढील बातमी
स्पिरीटच्या अवैध वाहतुकीवर उत्पादन शुल्कची कारवाई; शेंद्रे येथे 200 लिटर मद्यार्कासह 9.12 लाखांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या