इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दुसरे गोल रिंगण उत्साहात; दोन्हीही अश्वांच्या परिक्रमाने लक्ष लक्ष नयनांचे पारणे फेडले

by Team Satara Today | published on : 18 July 2026


इंदापूर :  इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा इंदापूर शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाल्यानंतर सोहळ्यातील मानाच्या दुसरे गोल रिंगण पार पडले. नगारखाना प्रदक्षिणा झाल्यानंतर अश्वाची रिंगण पाहणी आणि त्यांनंतर भगवे पताकाधारी झेंडेकरी, तुळशीवाल्या व हंडेकरी भगिनी, धावल्यानंतर, विणेकरी,पखवाजवाले धावले. त्यानंतर पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी धावा केला. सुरुवातीला मानाच्या आणि अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या अश्वाने प्रदक्षिणा पूर्ण करून दोन्हीही अश्वांच्या परिक्रमाने लक्ष लक्ष नयनांचे पारणे फेडले.. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रेश्वरांच्या इंदापूर नगरीत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी १८ जुलै रोजी बारा वाजता रयत शिक्षण संस्थेच्या कै. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला.

या रिंगण सोहळ्यास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आता माझी सरकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष भरात शहा,भाजपाचे जेष्ठ नेते प्रदिप गारटकर , नीरा भीमा साखर कारखान्याचे अध्यक्षा भाग्यश्री पाटील,सारिका भरणे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता ठाकरे यांच्यासह आजी- माजी नगरसेवक शहरातील नागरीक आदीं उपस्थित होते.

इंदापूर नगरपरिषदेने याही वर्षी अंत्यत चांगल्या पद्धतीने शहरात भव्य स्वागत कमानी उभारुन तसेच वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता,रिंगण स्थळी सुशोभीकरण अशी सर्व जय्यत जोरदार तयारी केली होती.


शनिवारी सकाळी निमगांव केतकीत आरती झाल्यानंतर पालखी सोहळा निरोप देवून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. इरिगेशन बंगला , हेगडेवस्ती, सोनमाथ्यावरिल चढ नसल्याने आनंदात सोनाई दुध संघावर संघाच्या वतीने सोनाई परिवाराकडुन वैष्णवांचे स्वागत करून त्यांना मसालेदार दुध, फराळ आदी सेवा देण्यात आल्या. पालखी सोहळा पुढे झगडेवाडी, तरंगवाडी मार्गस्थ होवून पालखी गोखळीच्या ओढ्यात न्याहारीसाठी विसावली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा येथील छोट्या गावकऱ्यांनी व नागरिकांनी फराळ नाश्टा देण्यात आला. पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी दिंडी करांनी रिंगण प्रदक्षिणेस सुरुवात केली. पालखी सोहळ्यातील नगारा प्रदक्षिणा झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अटक झाली तरी आंदोलन थांबणार नाही; सोनम वांगचुक यांच्या अटकेवर शरद पवारांचा केंद्रावर हल्लाबोल
पुढील बातमी
औद्योगिक वसाहतींमधील जमिनीचे वितरण करताना व्यवहार्यता तपासा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगांबाबत सर्व परवानगींसाठी मैत्री पोर्टलचाच उपयोग बंधनकारक

संबंधित बातम्या