भाजलेले चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे
सामान्यत: आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोक अनेक प्रकारची फळे आणि भाज्यांचे सेवन करतात. पण इतरही अनेक पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. यामध्ये चण्याचे महत्त्व अधिक असून चण्याचे रोज सेवन करणे निरोगी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. चणे रोज खाल्ल्याने शरीर मजबूत आणि निरोगी राहते.
हरदोईच्या शतायु आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्राचे डॉ. रोहित शर्मा यांनी सांगितले की, बरेच लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये हरभरे खातात. त्याच वेळी, त्यात प्रथिने देखील भरपूर असतात. पोषक तत्वांनी भरपूर असलेले चणे शरीराला मजबूत बनवताता आणि स्नायूंना बळकटी देण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
पचनक्रिया सुधारते
पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी
डॉ. रोहित शर्मा यांनी सांगितले की, चण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, काही लोक कच्चे चणे पाण्यात भिजवून खातात. मात्र भाजलेल्या चण्याच्या सेवन करण्याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर ते पचनशक्ती वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पोटात गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे शरीरात चयापचय वाढवण्यास देखील उपयुक्त ठरते असेही यावेळी डॉक्टरांनी सांगितले आहे.
ॲनिमिया आजारावर उपयुक्त
अॅनिमियासारख्या आजारांवर उपयुक्त
ॲनिमिया आजार असल्यास भाजलेले चणे खाणे खूप फायदेशीर आहे, तर गुळासोबत खाल्ल्यास अधिक फायदे मिळतात. गूळ आणि चणे खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळते. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे ॲनिमियासारख्या आजाराचा धोका रहात नाही आणि ज्यांना हा आजार आहे त्यांचा हा आजार कमी होण्यास मदत मिळते
डायबिटीसवर रामबाण
डायबिटीसच्या रुग्णांनी खावे भाजलेले चणे
भाजलेल्या चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी हा अतिशय फायदेशीर नाश्ता मानला जातो. पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास भाजलेले चणे अत्यंत उपयुक्त ठरतात. हे खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि जास्त वेळ भूक लागत नाही त्यामुळे खाण्यावरही नियंत्रण राहते
चण्यातील पोषक तत्व
चण्यातील पोषक तत्वांचा फायदा
डॉ. रोहित शर्मा सांगतात की चण्याचे पौष्टिक मूल्य नक्की काय आहे आहे. त्यांच्या मते, 100 ग्रॅम चण्यामध्ये सुमारे 58.99 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 25.21 ग्रॅम प्रथिने, 18.3 ग्रॅम आहारातील फायबर आणि 1.64 ग्रॅम चरबी असते. याशिवाय लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त आणि तांबे यांसारखे अनेक सूक्ष्म पोषक घटकही त्यात चांगल्या प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी उत्तम ठरतात
भाजलेल्या चण्यांचे अन्य फायदे
⦁ भाजलेल्या चण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असून यामुळे हाडे मजूबत आणि निरोगी होण्यास मदत मिळते
⦁ याशिवाय भाजलेल्या चण्यांमध्ये असलेले पोषक तत्व, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात
⦁ चण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील उर्जेची पातळी अधिक राहते आणि लोह मिळाल्याने अशक्तपणा टाळता येतो
⦁ भाजलेल्या चण्यांमध्ये अधिक प्रमाणात मॅग्नेशियम असून तणाव कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो
⦁ या भाजलेल्या चण्यांमध्ये समाविष्ट असणारे विटामिन सी हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असून केसांसाठी उत्तम ठरते. केसगळती, केसांचे तुटणे टाळून केसांची वाढ होण्यास मदत करते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |