जिल्हा हॉकर्स संघटनेला पालिकेने जाहीर केलेले नो हॉकर्स झोन अमान्य

संघटनेच्या बैठकीत निर्णय

by Team Satara Today | published on : 21 April 2025


सातारा : सातारा नगरपालिकेने शहरातील प्रमुख बाजारपेठेत नो हॉकर्स झोन जाहीर केले आहेत. याला विरोध करण्यासाठी सातारा जिल्हा हॉकर संघटनेने, आज सातारा नगरपालिकेच्या कार्यासमोर बैठक घेऊन, या निर्णयाचा विरोध केला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान, जिल्हा सरचिटणीस शामराव चिंचणे, शहराध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, आज सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नगरपरिषदेने जाहीर केलेले सर्व निर्णय त्वरित रद्द करावेत, नगरपरिषदेने कोणत्याही क्षेत्रातील हॉकर्सवर अन्यायकारक परस्पर कारवाई करू नये, शहर फेरीवाला समिती तातडीने स्थापन करावी, आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून नगरपालिकेने आम्हाला आहे त्या जागेवरून उठवू नये, अशी मागणी देखील यावेळी विक्रेत्यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजप मंडलाध्यक्षांच्या निवडी जाहीर
पुढील बातमी
म्हसवड पोलिसांची थरारक कामगिरी

संबंधित बातम्या