सातारा : मारहाण प्रकरणी तीनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मल्हार पेठेत तिघांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किरण वायदंडे, केतन वायदंडे, आंबाड्या यांच्या विरुध्द रोहित शिवराम साठे (वय 29, रा. ठाणे) यांनी तक्रार दिली आहे. विटाने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.