सातारा-जावलीतील २६ विकासकामांसाठी २ कोटी ३१ लाख मंजूर

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; जन सुविधांसाठी विशेष अनुदान योजनेतून मिळाला निधी

by Team Satara Today | published on : 12 September 2024


सातारा :  सातारा-जावली मतदारसंघात विकासकामांचा झंजावात सुरु ठेवणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा आणि जावली तालुक्यातील विविध प्रकारची २६ विकासकामे मार्गी लावण्यासाठी २ कोटी ३१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 'ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदान' या योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. 

सातारा तालुक्यातील कुसवडे येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे यासाठी १५ लाख, लिंब येथे वडार वाडा समाजमंदिर ते रामेश्वर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, डोळेगाव येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे १५ लाख, गोगावलेवाडी येथे रस्ते सुधारणा करणे १० लाख, वेणेखोल येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे १० लाख, कोंडवे येथे मेढा रस्ता ते स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, कारी येथे जानाई देवी मंदिर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, कुरुळबाजी येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण ८ लाख, हातगेघर येथे अण्णासाहेब पाटील चौक ते स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, मापरवाडी येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे यासाठी १५ लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. 

जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथे दत्तनगर अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे १० लाख, म्हाते खु. स्मशानभूमी रस्ता व शेड करणे १० लाख, केळघर येथे लिंगायत स्मशानभुमीस संरक्षक भिंत बांधणे ७ लाख, बामणोली तर्फ कुडाळ गावठाणांतर्गत बंदिस्त गटर करणे ५ लाख, गोटेघर येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे १५ लाख, फळणी येथे स्मशानभूमी शेड बांधणे ५ लाख, महिगाव येथे स्मशानभुमीस वाढीव संरक्षक भिंत बांधणे ५ लाख, विवर येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख, कावडी येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख, मोहाट येथे स्मशानभूमी करणे ५ लाख, कोळघर येथे स्मशानभूमी करणे ८ लाख, वालुथ येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, वहागाव येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे १२ लाख, सोमर्डी येथे स्मशानभूमी शेड बांधणे १० लाख, आनेवाडी येथे स्मशानभूमीमध्ये दशक्रिया विधी चबुतरा बांधणे व सोलींग करणे ५ लाख आणि आखाडे येथे स्मशानभूमी बांधकाम करणे यासाठी ६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे तात्काळ सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
पुढील बातमी
सकल हिंदू समाजाचे आंदोलन

संबंधित बातम्या