कोयना परिसरात भूकंपाचा धक्का

by Team Satara Today | published on : 01 October 2025


कोयनानगर : कोयना परिसरात सोमवारी रात्री भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल नोंदवली गेली होती. पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात  सोमवारी रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल नोंदविली गेली. सौम्य प्रकारच्या धक्क्याची तीव्रता वर्ग तीन मध्ये आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना भुकंपमापन केंद्रापासून चार किलोमीटर अंतरावरील हेळवाक  गावाच्या नैऋत्येला तीन किमी होता. तर या भूकंपाच्या केंद्रबिंदुची खोली पाच किलोमीटर अंतरावर होती. भूकंपाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानीची झाली नाही


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृषि समुद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुढील बातमी
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडळातील 16 हजार ग्राहकांना 122 कोटी रूपये अनुदानाचे वितरण

संबंधित बातम्या