दिल्ली : दिल्ली पोलिसांनी देशभरात मोठी कारवाई केली आहे. देशभरातील अनेक भागात छापेमारी केली आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत इसिस दहशतवादी संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या 8 ते 10 जणांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिस आणि झारखंड पोलिस यांनी एकत्रितपणे कारवाई केली आहे.
झारखंड आणि दिल्ली पोलिस तसेच एटीएसने रांचीमधील एका लॉजमधून isis चा संशयित दहशतवादी दानिशला अटक केली आहे. हा संशयित दहशतवादी अनेक दिवसांपासून या लॉजमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि झारखंड एटीएस यांनी एकत्रितपणे केली आहे.
दरम्यान दानिशला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिस त्याचा ताबा घेणार आहेत. त्यानंतर त्याला घेऊन पोलिस दिल्लीला रवाना होणार आहे. एक संशयित रांचीत लपला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळताच त्यांनी झारखंड एटीएसशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी एकत्रितपणे लॉजवर छापेमारी केली व दानिशला अटक केली आहे.
दानिशला अटक करण्यात आलेल्या लॉजवरील खोलीतून बरेच सामान जप्त करण्यात आले आहे. आपत्तीजनक वस्तु व केमिकल आणि काही नकाशे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एका आयसिस दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यानंतर देशभरात १२ हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. देशभरातून आठ हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी आफताब हा मुंबईचा रहिवासी आहे. अशर दानिश नावाच्या संशयित दहशतवाद्यालाही रांचीमध्ये अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस, झारखंड एटीएस आणि रांची पोलिसांनी संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली आहे. सध्या अटक केलेल्या सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे.
देशभरातील विविध राज्यांमध्ये १२ हून अधिक ठिकाणी विशेष सेल आणि केंद्रीय एजन्सींनी छापे टाकले आहेत. या दरम्यान, टीमने वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण ८ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणात, दिल्ली स्पेशल सेलचे म्हणणे आहे की संपूर्ण प्रकरणात अजूनही तपास आणि चौकशी सुरू आहे.