सातारा : शाहूनगर परिसरातील एका निवासी फ्लॅटमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमराई कॉलनीतील शिवालय अपार्टमेंटमध्ये दुपारच्या वेळेत घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाला. चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये मंगळसूत्र, कानातील दागिने, वेल आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. सीमा संतोष देवरे यांच्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.